शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कारनं अचानक घेतला पेट, बाहेर पडण्यास वेळ न मिळाल्यानं तीन तरुणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 12:51 IST

पुणे, दि. 23 - पुण्यातील वडगाव आनंदमध्ये एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा होरपळून ...

पुणे, दि. 23 - पुण्यातील वडगाव आनंदमध्ये एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटाजवळ मंगळवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  गाडीतून प्रवास करणारे  तिन्ही तरुण पुण्यावरुन घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीनं पेट घेतल्यानंतर बाहेर येण्यास वेळ न मिळाल्यामुळे तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले अशी मृतांची नावे आहेत. 

कसा झाला अपघात ?आळेफाटाहून वडगाव आनंद येथे जात असताना बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले यांच्या कारची पुलाला धडक बसली व यानंतर कारने पेट घेतला. हे तिघंही ओतूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. नरेश वाघ आणि दिलीप नवले हे औषध विक्रेते तर बंटी चासकर हे हॉटेल व्यावसायिक होते.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघंही जण त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी वडगाव आनंद येथे जात होते. गाडी भरधाव वेगात होती. प्रवासादरम्यान वाटेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की गाडीने पेट घेतला आणि या अग्नितांडवात तिघांचाही होरपळून जागीच मृत्यू झाला. 

यावेळी काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. पोलीसही घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण गाडीचा जळून कोळसा झाला होता. दरम्यान, गाडीला धडक बसल्यानंतर शॉर्टशर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.