शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

नेसरीकरांवर यशस्वी त्वचारोपण

By admin | Updated: May 13, 2015 01:43 IST

काळबादेवी येथील आगीत भाजून जखमी झालेल्या सुनील नेसरीकर यांच्यावर मंगळवारी ऐरोलीतील बर्न सेंटर रुग्णालयात यशस्वी त्वचारोपण

नवी मुंबई : काळबादेवी येथील आगीत भाजून जखमी झालेल्या सुनील नेसरीकर यांच्यावर मंगळवारी ऐरोलीतील बर्न सेंटर रुग्णालयात यशस्वी त्वचारोपण करण्यात आले. जळलेली त्वचा काढून तिथे दुसरी त्वचा बसवण्यासाठी सुमारे ६ तास लागले. तर सुधीर अमिन यांच्यावर मात्र अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.सुनील नेसरीकर व सुधीर अमिन गंभीर जखमी झाले आहेत. नेसरीकर हे ५० टक्के तर अमिन हे ९० टक्के भाजले आहेत. दोघेही बर्न सेंटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी नेसरीकर यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. सुनील केशवानी यांनी सांगितले. त्यांच्या दोन्ही पायांवरील जळालेली त्वचा काढून दुसरी त्वचा बसवण्यात आली. याकरिता त्यांच्या शरीरावरील चांगल्या त्वचेचा तसेच रुग्णालयाच्या स्कीन बँकेतील काही त्वचेचा वापर करण्यात आल्याचेही डॉ. केशवानी यांनी सांगितले. पुढील पाच दिवस त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र सुधीर अमिन यांच्या प्रकृतीत अद्याप आवश्यक ती सुधारणा झालेली नसून ते व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले. नेसरीकरांवर रविवारी एक शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची जळलेली त्वचेला संसर्ग होऊ नये, त्वचेला त्रास होऊ नये म्हणून त्वचारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्वचारोपणासाठी ८० टक्के त्वचा त्वचापेढीतून घेण्यात आली होती तर २० टक्के नेसरीकरांची त्वचा घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)