शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
5
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
7
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
8
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
9
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
10
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
11
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
12
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
13
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
14
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
16
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
17
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
18
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
19
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
20
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृत प्राण्यांचा सफाया करणारा ‘मोरेश्वर’ सापडला; पर्यावरण स्वच्छतेचं करतो काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 05:47 IST

पर्यावरणाच्या साफसफाईसाठी करतो काम, शास्त्रज्ञ अपर्णा कलावटे यांचे संशोधन

पिंपरी (जि. पुणे) : भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुटाक्सा’मध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी याबाबतचा शोधप्रबंध प्रकाशित झाला. ‘मोरेश्वर’ असे या कीटकाचे नामकरण केले आहे. मृत प्राणी किंवा व्यक्तीचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य त्यांच्याकडून होते.

भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा शोध लावला. प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात त्या कार्यरत आहेत. द. आफ्रिकेच्या डिट्सॉन्ग नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे संचालक वर्नर पी. स्ट्रुम्फर यांनी शोधप्रबंधाचे सहलेखक म्हणून सहकार्य केले.

मोरेश्वर मंदिर परिसरात दिसला... डाॅ. अपर्णा यांनी गेल्यावर्षी बीटल अर्थात ओमोर्गस खान्देश स्ट्रुम्फर आणि कलावटे, २०२३ हा शोधप्रबंध सादर केला होता. नव्याने सापडलेला कीटक ट्रोगिडे कुटुंबातील आहे. नवीन कीटकाबाबत ओमोर्गस (ॲफ्रोमॉर्गस) मोरेश्वर कलावते आणि स्ट्रुम्फर, २०२४ हा शोधप्रबंध सादर केला. 

हा कीटक १३ एमएम आकाराचा आहे. त्याच्या नऊ प्रजाती आहेत. या शोधामुळे भारतातील या प्रजाती दहावर गेल्या आहेत. मोरगाव येथील मोरेश्वर मंदिर परिसरात हा कीटक सापडला. त्यामुळे या कीटकाचे ‘मोरेश्वर’ नामकरण केले.

पहिल्या भारतीय शास्त्रज्ञकेराटिन कीटकांचा भारतामध्ये कमी अभ्यास केला जातो. डाॅ. अपर्णा कलावटे या ट्रॉगिड कीटकांवर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत.  त्यांनी कीटकांच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला. आजपर्यंत केवळ परदेशी शास्त्रज्ञच भारतीय ट्रॉगिड जीवजंतूंचे वर्णन करत होते.

हे कीटक मृत जीवांचे शव खाऊन पर्यावरणाची स्वच्छता करण्यात मानवाला मदत करत आहेत. या चिमुकल्या कीटकाच्या संवर्धनासाठी त्याचे महत्त्व आणि स्वरूप याविषयी जनजागृती आवश्यक आहे. भारतातील या कमी अभ्यासलेल्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण करणे हेच उद्दिष्ट आहे.   - डॉ. अपर्णा कलावटे, शास्त्रज्ञ, पुणे