शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 05:59 IST

एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश दिले जाऊ नयेत, तसेच असे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाईचा इशारा एनएमसीने दिला आहे.

मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयांना यावर्षी प्रवेश दिलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना ही माहिती ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश दिले जाऊ नयेत, तसेच असे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाईचा इशारा एनएमसीने दिला आहे. एनएमसीने जारी केलेल्या मानकांनुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे का? याची तपासणी आता एनएमसीने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्याचे वय, त्याची बारावीची गुणपत्रिका, नीट परीक्षेत मिळाले गुण तसेच त्यातील रँक, प्रवर्ग, दिव्यांगत्वाची माहिती, प्रवेशाचा कोटा तसेच विद्यार्थ्याकडून आकारण्यात आलेले शुल्क यांचे तपशील एनएमसीने मागवले आहेत.

...अन्यथा प्रवेश रद्दमहाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास ते रद्द ठरवण्याची तंबीही एनएमसीने दिली आहे. या विद्यार्थ्याचे ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्ष वय पूर्ण असावे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला नीट परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४५ टक्के, तर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी ४० टक्के असावेत. नियमांचा भंग करून प्रवेश दिल्यास वैद्यकीय महाविद्यालयांवर १ कोटी रुपयांचा अथवा संबंधित अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी आकारण्यात येणाऱ्या फी एवढा दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीय