शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मूळ रेकॉर्ड कोर्टात जमा करा

By admin | Updated: October 28, 2016 02:02 IST

राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन (एनयूएचएम) ही केंद्राची योजना राज्यात राबविण्यासाठी केल्या गेलेल्या औषध खरेदीत २९७ कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचे उघड

औरंगाबाद: राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन (एनयूएचएम) ही केंद्राची योजना राज्यात राबविण्यासाठी केल्या गेलेल्या औषध खरेदीत २९७ कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर या खरेदीसंबंधीच्या सरकारी रेकॉर्डमध्ये गडबड केली जाण्याची किंवा ते नष्ट केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला आहे.‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी या औषध खरेदीतील घोटाळ््यासंबंधी गेल्या मार्चमध्ये लिहिलेल्या वृत्तमालिकेच्या अनुषंगाने न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. के. के. सोनावणे यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने स्वत: कुलकर्णी यांना याचिकाकर्ते करून हा विषय जनहित याचिका म्हणून हाती घेतला आहे.गेल्या तारखेला न्यायालयाने अ‍ॅड. डी. पी. पालोदकर यांची या सुनावणीत ‘अ‍ॅमायकस क्युरी’ म्हणून नेमणूक केली होती. पालोदकर यांनी या याचिकेत केलेल्या अर्जाची दखल घेऊन खंडपीठाने वरीलप्रमाणे सर्व मूळ रेकॉर्ड येत्या १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाच्या निबंधकांकडे (न्यायिक) जमा करण्याचा आदेश दिला. शिवाय औषध खरेदी आणि त्यांचे वितरण यात झालेल्या अनियमितता व बेकायदेशीरपणात हात असल्याचा ज्या अधिकाऱ्यांवर संशय आहे, अशा अधिकाऱ्यांना औषधांची खरेदी, पुरवठा आणि निविदाप्रक्रिया इत्यादी संबंधित कामांपासून सरकारने दूर ठेवणे अपेक्षित आहे. तसेच त्यांचा रेकॉर्डशी संबंध येणार नाही, याचीही सरकारने खात्री करावी, असेही खंडपीठाने नमूद केले.न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्याने या घोटाळ््यात हात असल्याचा संशय असलेल्या अधिकाऱ्यांकडून पुरावे आणि रेकॉर्डमध्ये हेराफेरी केली जाण्याची शक्यता ‘अ‍ॅमायकस क्युरी’ने व्यक्त केल्यानंतर या प्रकरणी योग्य चौकशी शक्य व्हावी, यासाठी हे आदेश देण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)२५ कोटींची औषधे वायाखरेदी केलेली २५ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची औषधे त्यांची मुदत संपल्याने किंवा संपण्याच्या बेतात असल्याने, न वापरताच वाया जाऊन जनतेचा तेवढा पैसा पाण्यात जाणार आहे, याकडे अ‍ॅड. पालोदकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. याचा तपशील देताना त्यांनी अर्जात लिहिले की, २२ कोटी रुपयांच्या औषधांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे आणि तोपर्यंत न वापरल्यास ती वाया जातील. याखेरीज ३.४० कोटी रुपयांच्या औषधांची मुदत याआधीच म्हणजे जून किंवा जुलैमध्ये संपून गेली आहे.अधिकाऱ्यांची चौकशीगरज नसताना केलेल्या औषध खरेदीच्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आरोग्य सेवा संचालनालयातील पाच अधिकाऱ्यांची खुली चौकशी याआधीच सुरू केली आहे, असे अ‍ॅड. पालोदकर यांनी लक्षात आणून दिल्यावर न्यायालयाने संशय असलेल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवण्याचा आदेश दिला.या संदर्भात त्यांनी ‘एसीबी’चे ३ आॅक्टोबरचे पत्र सादर केले. त्यानुसार डॉ. जोतकर, सतीश पवार, सचिन देसाई, राधाकिशन पवार आणि डॉ. वैभवराव पाटील या पाच अधिकाऱ्यांना ‘एसीबी’ने चौकशीसाठी ६ आॅक्टोबर रोजी बोलावले होते.या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यानेपुढील रेकॉर्ड न्यायालयात जमा करायचे आहे- ‘एनयूएचएम’ योजनेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सन २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ या तीन वर्षांत केलेल्या औषध खरेदीसंबंधीचे सर्व मूळ रेकॉर्ड व फाईल्स.- विविध इस्पितळे व स्थानिक स्वराज्य संस्थांनी या तीन वर्षांत केलेली औषधांची मागणी व त्यांना केला गेलेला पुरवठा यासंबंधीचे सर्व मूळ रेकॉर्ड व फायली.- या तीन वर्षांत औषध खरेदीसाठी अवलंबिलेल्या निविदा प्रक्रियेसंबंधीचे सर्व रेकॉर्ड व फायली.- या औषध खरेदीच्या संदर्भात ‘कॅग’ आणि राज्याच्या वित्तीय लेखा परीक्षण विभागाचे सर्व आॅडिट रिपोर्ट.- या खरेदीतील गैरव्यवहार व अनियमितता यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या भगवान सहाय समिती, गौतम चटर्जी समिती यासह इतर चौकशी समित्यांचे अहवाल.- न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी दिवाळीच्या सुट्टीनंतर १८ नोव्हेंबर रोजी करणार आहे.