शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थ्याच्या आत्महत्येने यंत्रणेला आली जाग

By admin | Updated: November 24, 2015 02:56 IST

गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर

अकोला/रिधोरा : गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर, महसूल यंत्रणेने बाळापूर तालुक्याच्या दधम येथील या कुटुंबाची माहिती गोळा केली.विशाल खुळे हा अकोला येथील महाराणा प्रताप खासगी विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. शासनाची मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकाची योजना इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच असल्याने त्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र, त्याला विद्यालयामार्फत प्रवासासाठी एसटी पास मिळाला होता. विद्यालय अनुदानित असल्याने शुल्काचाही प्रश्नच नव्हता. मात्र, सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे गणवेश आणि पुस्तकांसाठी त्याच्या कुटुंबीयांकडे कोणतीही सोय नव्हती.अखेर विशालनेच कंबर कसली. त्याने दिवाळीच्या सुट्टीमध्ये शेतमजुरी सुरू केली. त्याच्याकडे दोन विषयांची पुस्तके नव्हती. यासाठी त्याने मजुरी करून पैसे जमविणे सुरू केले. मात्र, दुसरीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत गेल्याने, तो पुस्तकांची सोय करू शकला नाही. अखेर त्याने रविवारी विषारी औषध प्राशन केले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विशालच्या कुटुंबीयांची बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके आणि तलाठी प्रशांत सायरे यांनी भेट घेतली. (लोकमत चमू)विशाल होता दु:खी : आर्थिक परिस्थितीमुळे आवडत्या वस्तू मिळत नाहीत, ही बाब विशालला नेहमी बोचत असे. स्वत: शेतमुजरी करूनही नवीन कपडे तो विकत घेऊ शकला नाही. त्यामुळे तो निराश होता. एकूणच परिस्थितीमुळे तो खचला होता. परिणामी, त्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.