शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

शिरदवाडचे विद्यार्थी गिरवताहेत ‘मोडी’चे धड

By admin | Updated: February 9, 2015 23:59 IST

राज्यातील पहिली शाळा : लोप पावणाऱ्या लिपीला मिळणार ऊर्जितावस्था े

गणपती कोळी-  कुरुं दवाड -- इतिहासकालीन मोडी लिपी लोप पावत असतानाच शिरदवाड (ता. शिरोळ) येथील कुमार विद्यामंदिरात मोडी लिपी शिकविली जात आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिक्षकांनी २२ विद्यार्थ्यांची एक तुकडी तयार केली आहे. या विद्यार्थ्यांना मोडी लिपीत लिहिता व वाचता येते. मोडी लिपी शिकविणारी महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा ठरली आहे. जादा तास घेऊन मुलांना मोडी लिपी शिकविण्याचा या शाळेतील शिक्षकांचा हा अभिनव उपक्रम स्तुत्य ठरला आहे.मोडी लिपीची सुरुवात १२ व्या शतकात झाली. शिवकाळात ती बहरली आणि पेशवेकाळात देशभर पसरली. तत्कालिन अज्ञापत्र, इनामपत्र, वतनपत्रे, दफातपत्रे, झडती, तहनामा, कतबा, सनद, दस्तऐवज मोडी लिपीतच लिहिली आहेत. मात्र, १९४५ ते ६० या पंधरा वर्षांत मोडीचा वापर कमी होत गेला आणिा ही लिपी हद्दपार झाली. पूर्वी मोडीचा सर्रास वापर होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील, भूमिअभिलेख, नगरपालिका, आदी कार्यालयातील कागदपत्रे, जन्म-मृत्यू रजिस्टर, शाळांमधील जनरल रजिस्टर ही सर्व मोडीमध्ये होती. मात्र, १९६० नंतर मोडीचा वापरच बंद झाल्याने या लिपीतील मजकूर वाचणारे व लिहिणारेही दुर्मीळ झाले आहेत. परिणामी इनाम पत्रके, सातबारा, जातीचे दाखले, आदींसाठी पूर्वीच्या मोडी नोंदीतील कागदपत्रावरून प्रमाणित दाखला देणे शक्य होत नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. त्यासाठी एखाद्या मोडी लिपी येणाऱ्याचा शोध घेऊन त्याला ‘मुॅँह मॉँगे दाम’ देऊन मजकूर वाचून घ्यावा लागतो. यात वेळ व पैशाचा अपव्यय होतो. भविष्यकाळात या लिपी विषयी येणारी अडचण, मुलांच्या बौद्धिक विकासात आणखी एका लिपीची भर पडावी, या उद्देशाने आकाराम साळोंखे व बापू आंबी यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी राजाराम काळगे, मुख्याध्यापक रमेश कोळी यांचे सहकार्य मिळत आहे. मुळातच मोडी लिपीबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. या उपक्रमामुळे मोडी शिकविणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जात आहे.बावीस विद्यार्थ्यांची निवडपहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत नवीन लिपी शिकण्याची आवड असलेल्या बावीस मुलांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. जादा तास घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून आकाराम साळोंखे व बापू आंबी हे शिक्षक विद्यार्थ्यांना मोडी लिपितील बाराखडीपासून शिक्षण देत आहेत. सध्या ही मुले मोडी वाचण्यास व लिहिण्यासही शिकली आहेत. मोडी लिपीच्या या वर्गासाठी शास्त्रशुद्ध नियोजन केले आहे. मुळाक्षरे, जोडाक्षरे, सोपी वाक्ये, कथा, ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. लुप्त पावत असलेल्या या लिपीेला ऊर्जितावस्था देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना नवीन लिपी अवगत व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. - आकाराम साळोखे, मोडी लिपीचे शिक्षक, कुमार विद्यामंदिर