शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांची थट्टा, शष्यवृत्तीपोटी मिळतात महिन्याला अवघे १०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:37 IST

प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.

दीपक जाधव पुणे : प्राथमिक व माध्यमिकमधील गुणवंत (स्कॉलर) विद्यार्थ्यांना शासनाकडून महिना १०० रुपयांची तुटपुंजी शिष्यवृत्ती देऊन थट्टा केली जात आहे. या शिष्यवृत्तींमध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आली नसल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या १५ लाखांवरून ८ लाखांपर्यंत घसरली आहे.महाराष्टÑ शासनाने गुणवंत विद्यार्थ्यांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी १९५४ पासून ४वी व ७वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा घेऊन दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते. दोन वर्षांपूर्वी या परीक्षांच्या इयत्तेमध्ये बदल करण्यात आला असून आता ५वी (पूर्व उच्च प्राथमिक) व ८वी (पूर्व माध्यमिक)च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. यंदा ५ वी व ८ वी या दोन्ही इयत्तांसाठी मिळून केवळ ७ लाख ८९ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. २००९मध्ये ही संख्या २१ लाख होती.शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाºया ५वीच्या १६ हजार, तर ८वीच्या १३हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये अनेक वर्षांपासून वाढच करण्यात आलेली नाही. महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करूनही अनेक दिवस उलटले, तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे़ परिक्षार्थींची संख्या अजून कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे़

टॅग्स :Studentविद्यार्थी