ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - नवी मुंबई येथे एका शाळेच्या इमारतीवरून पडून सातवीतील मुलाचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेत ही घटना घडली आहे.
विघ्नेश साळुंके असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो सातवीत शिकत होता. आज सकाळी तो शाळेत गेला असता साडेसातच्या सुमारास तो चौथ्या मजलयावरू काली पडून जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून विघ्नेश नेमका कसा पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.