शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

आई मला शाळेला जाऊ दे न वं....; विद्यार्थी आतूर, आजपासून घंटा वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:11 IST

पाचवी ते आठवीचा श्रीगणेशा

सांगली : तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून (दि. २७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत बेंचवर बसण्याचा आनंद लुटण्यासाठी शाळकरी मुले आतूर झाली आहेत.

विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देताना पालकाचे संमत्तीपत्र सक्तीचे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तशा सूचना शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण सध्या अत्यल्प असल्याने पालकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय लसीकरणही सुरू झाल्याने  पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी सकारात्मकही आहेत. शिक्षकांच्या कोरोना तपासण्या वेगाने सुरू आहेत. 

प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तरावर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. महापालिकेनेही आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येने शिक्षक असलेल्या शाळांत आरोग्य कर्मचारी स्वत: जात आहेत, तर उर्वरित ठिकाणी शिक्षक स्वत:च चाचणी केंद्रात जात आहेत. सध्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या सुरू आहेत. 

  • १५ मार्चपासून विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे नव्या आरंभासाठी ते उत्सुक आहेत.
  •  मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार याचीही उत्सुकता लागून आहे.
  • तीन-चार महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात फारसे शिरलेले नाही
  • ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करायला लागतोय. मोबाइल उपलब्ध नसण्यापासून रेंज नसण्यापर्यंतची डोकेदुखी विद्यार्थ्यांपुढे आहे.
  • मुले महिनो न महिने घरीच राहिल्याने पालकही चिंतीत आहेत. घरातील दोघा-तिघा मुलांना एकच मोबाईल कसा पुरणार, ही मोठी समस्या त्यांच्यापुढे आहे.
  •  जिल्हा परिषद शाळांचे विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल अत्यंत चांगले आहेत. खासगी शाळांना याबाबतीत कोसो दूर फेकले आहे. पण वर्ग सुरू नसल्याने ही गुणवत्ता कशी टिकणार, हा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक व पालकांपुढे आहे.
  • परीक्षांचा हंगाम तोंडावर असल्यानेही विद्यार्थ्यांना वर्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

 

वर्गांची तयारी सोमवारपासूनचशाळांमध्ये पुनश्च हरिओम करण्यासाठी शिक्षकांची तयारी सोमवारपासाूनच सुरू झाली. मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता व इतर तयारीसाठी शिक्षक सकाळपासूनच कामाला लागले होते. काही शाळांमध्ये वर्गांचे निर्जंतुकीकरण रविवारपासूनच सुरू झाले. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसाठी साहित्य दिले, तर काही ठिकाणी पालक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, फवारणी पंप उपलब्ध करून दिले. छोट्या गावांत खुद्द मुलेच साफसफाईच्या कामासाठी स्वेच्छेने पुढे आल्याचे दिसले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा