शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती स्वयंपाकघरातून विद्यार्थ्यांना जेवण; राज्यात वसतिगृहांमध्ये सीसीटीव्हीही बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:23 IST

राज्यातील इतर जिल्ह्यातील वसतिगृहांच्या तुलनेत मुंबई, पुणे येथील वसतिगृहे बऱ्या परिस्थितीत आहेत. मात्र इतर ठिकाणच्या वसतीगृहाची अवस्था फारच कठीण आहे.

मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणाचा अतिशय सुमार दर्जा स्वत: अनुभवल्यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती स्वयंपाक घर (सेंट्रलाईड् किचन) राबविण्याचे ठरविले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येतील.मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत ही माहिती दिली. राज्यातील इतर जिल्ह्यातील वसतिगृहांच्या तुलनेत मुंबई, पुणे येथील वसतिगृहे बऱ्या परिस्थितीत आहेत. मात्र इतर ठिकाणच्या वसतीगृहाची अवस्था फारच कठीण आहे.यातील अनेक इमारतींची नव्याने बांधणी, पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व इमारतींच्या सुधारणेचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सर्वच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळावे यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील पुरवठादार, ठेकेदारांना संधी देवून मध्यवर्ती स्वंयपाक घर सुरू करण्यात येणार आहे. नीटनेटके स्वयंपाकघर त्यासाठी असेल आणि जेवणाचा दर्जा निश्चितपणे सुधारेल, असे ते म्हणाले.