संगमनेर (अहमदनगर) : बारावीचे काही पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पेमरेवाडी येथे रघडली. घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथील महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी मयूर डोंगरेने गणित व इतर पेपर अवघड गेल्याचे शनिवारी वडिलांना सांगितले. डोंगरे यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळले. पोलीस पाटील विजय पोखरकर यांनी तातडीने घारगाव पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)
पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Updated: February 29, 2016 04:29 IST