मुंबई : सीएची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने कमी गुण मिळाल्याच्या तणावाखाली आत्महत्या केली आहे, या प्रकरणी चारकोप पोलिसांत आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. अनामिका मथुली (२३) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. अनामिका ही मूळची पश्चिम बंगालची आहे. कांदिवलीत एका फ्लॅटमध्ये ती भाड्याने राहत होती.तिने चार्टर्ड अकाउंटंट (सीए)ची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १७ जानेवारीला लागला. यात तिला यश आले नाही. या गोष्टीमुळे ती तणावाखाली होती. चारकोप पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाला बोलावले. त्यांनी अनामिका राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश मिळवला. तेव्हा सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत अनामिका आढळून आली. (प्रतिनिधी)
विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: January 21, 2017 05:50 IST