नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील सावली मिथेखार भागात माजी आमदार श्याम सावंत यांचा कोळंबी प्रकल्प आहे. कोळंबी प्रकल्पासाठी आवश्यक असणारी यंत्र सामुग्रीची चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी के ली होती. तशा प्रकारची फिर्याद या प्रकल्पाची देखरेख करणारे दीपेश कदम यांनी मुरु ड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक दिगंबर सावंत यांनी या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेत अवघ्या काही दिवसात चार आरोपींना मुद्देमालासह अटक के ली होती. त्यांना मुरुड दिवाणी न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सावली मिथेखार भागात माजी आमदारांचा कोळंबी प्रकल्प आहे. यावर देखरेख करण्याचे काम दीपेश कदम हे करत असत. रात्रीच्या वेळी या कोळंबी प्रकल्पामधून काही चोरट्यांनी पाणी फिल्टर करण्याची मशीन, पाईप व अन्य लोखंडी साहित्य असा सुमारे १९ हजार ५०० रु. ऐवज घेऊन पोबारा केला होता. पोलीस या चोरांचा कसून तपास करीत होते अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना मुद्दे मलासहित अटक करण्यात यश मिळवले. अटक केलेले तीन आरोपी हे भालगाव गावात राहणारे आहेत. भरत कोळी, किरण वाळेकर, लक्ष्मण जाधव, गोविंद जयस्वाल यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व चोरांना मुरु ड दिवाणी न्यायालयात हजार केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चोरांना अटक करण्यात यश मिळवले.
‘कोळंबी’तील मशीन चोरणाऱ्यांना अटक
By admin | Updated: September 10, 2016 02:36 IST