शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची प्रवास सवलत ‘आधार’ सक्तीत अडकली

By admin | Updated: March 25, 2015 02:03 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणारी सवलत आधार कार्डाच्या सक्तीत अडकली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणारी सवलत आधार कार्डाच्या सक्तीत अडकली आहे. मात्र महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बोलण्यास असमर्थता दर्शवित राज्य शासनाकडे बोट दाखविले आहे.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी प्रवासादरम्यान ‘आधार’सक्ती करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला अनेक दिवस उलटल्यानंतरही त्याचे अधिकृत आदेश महामंडळाला मिळालेले नाहीत. मात्र रावते यांच्या घोषणेनंतर राज्यात एस.टी. बसमधील अनेक वाहक सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अपंगांना आधार कार्ड दाखविण्याची सक्ती करीत आहेत. आधार कार्ड नसल्याने त्यांच्याकडून तिकिटाचे पूर्ण पैसे घेतले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राज्य शासनाकडून तिकीट दरात सवलत दिली जाते. त्यासाठी तहसीलदारांमार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र मागील काही वर्षांत बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत झाल्या. त्यातून लाखो बोगस प्रमाणपत्रांचे वाटप झाले. त्यामुळे एस.टी.सह राज्य सरकारलाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी महामंडळाने निवडणूक ओळखपत्र किंवा वयाचा कोणताही पुरावा वाहकाला दाखविणे आवश्यक केले. मात्र सध्या केवळ ‘आधार’ची सक्ती केली जात आहे. महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘आधार’सक्तीबाबतचा आदेश राज्य शासनच काढू शकते. महामंडळ असा आदेश काढू शकत नाही. ज्येष्ठांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडेही आल्या आहेत. अनेक बोगस प्रमाणपत्रे सापडली असून, अशा टोळ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जात आहे. तरीही आधारची सक्ती करणे चुकीचे आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यायला हवा. (प्रतिनिधी)