शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

एसटी ‘शिवशाही’चा यंदाचाही मुहूर्त हुकला

By admin | Updated: January 25, 2017 03:59 IST

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील एसी शिवशाही बसची गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात घोषणा केली होती.

मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील एसी शिवशाही बसची गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात घोषणा केली होती. निविदा प्रक्रियेस लागलेला विलंब आणि अन्य काही समस्यांमुळे शिवशाही बस ताफ्यात येऊ शकली नाही. मात्र महामंडळाने दोन शिवशाही बस ताफ्यात आणण्यासाठी तयारी केली आणि २0१७मधील २३ जानेवारीचा मुहूर्त ठरविला. परंतु हा मुहूर्तही हुकला असून, या बसमध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. खासगी वाहतुकीकडे गेलेल्या एसटीच्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षभरात चांगलीच कंबर कसली आणि अनेक सुविधा प्रवाशांसाठी आणण्याचा निर्णय घेतला. यात सर्वांत महत्त्वाची घोषणा व मोठा प्रकल्प असलेल्या एसटीच्या एसी शिवशाही बसचाही समावेश होता. परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. या सोहळ्यानंतर ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगत लवकरच शिवशाही ताफ्यात येईल, अशी माहिती वारंवार देण्यात आली. परंतु ही बस नियोजित कालावधीत एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नाही. त्यामुळे २0१६च्या एप्रिल ते जून, गणेशोत्सव, दिवाळी या गर्दीच्या हंगामात एसटीला आर्थिक फटका बसला.ही बस आणण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एका कंपनीने पुढाकार घेतला. मात्र, मोठ्या प्रमाणात बस भाडेतत्त्वावर देतानाच, त्यात एसटीकडून लादण्यात आलेल्या अटींमुळे फायदा होत नसल्याने कंपनीने माघार घेतली. त्यामुळे एसटी महामंडळावर मोठी नामुश्की ओढवली. सदर कंपनीकडून दोन शिवशाही बस तयारही ठेवण्यात आल्या होत्या. ॉ परंतु बसमध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने हा मुहूर्तदेखील हुकला. (प्रतिनिधी)