शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून; प्रवास भाड्यात 10 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 07:01 IST

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे.

पुणे : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी ची सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. १ ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याचकाळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल. पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.एसटीने दिवाळीनिमित्त १० टक्के प्रवासभाडे वाढविले आहे. ही भाडेवाढ दि. १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. पण काही बुकिंग आधीच्या दरानुसारच झाले आहे. बहुतेक जण दीड पट प्रवास भाडे आकारत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी एसटीच्या दीडपटच भाडे आकारावे. - बाळासाहेब खेडेकर,अध्यक्ष, पुणे डिस्ट्रीक लक्झरी बस असोसिएशनखासगी ट्रॅव्हल्सचे जादा भाडेखासगी ट्रव्हल कंपन्यांना एसटीच्या प्रवास भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याची मुभा राज्य शासनाने दिली आहे. त्यानुसार बहुतेक ट्रव्हल्सकडून भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, काही ट्रॅव्हल्सकडूनअजूनही जादा भाडे आकारले जात आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच ट्रॅव्हल मालकांची बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये नियमापेक्षा जादा भाडे न आकारण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.जादा भाडेदर आकारल्यास खासगी वाहनांवर होणार कारवाईसरकारने ठरवून दिल्या प्रमाणे भाडे न आकारणाऱ्या प्रवाशी वाहनांवर मोटार वाहन कायद्या प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिला.दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्या काळात नेहमीच्या प्रवास शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) अधिकारी आणि खासगी बस वाहतूकदारांची बैठक आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने टप्पा वाहतूकीचे दर या पुर्वी जाहीर केले आहेत. त्यानुसार बससाठी येणाºया प्रति किलोमीटर खर्चापेक्षा ५० टक्क्यांहून असणार नाहीत. त्यानुसार कमाल भाडेदरही निश्चित करण्यात आले आहे.खासगी बस वाहतुकदारांनी आॅनलाईन आरक्षण दर त्या पेक्षा अधिक दर्शविल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. भाडेदर नियमापेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिली. नियमापेक्षा ज्यादा भाडेदर आकारल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ