शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यातील एसटी फायद्यात येणार? मालवाहतुकीनंतर आता कुरिअर सेवा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 09:16 IST

वर्षाला ५०० कोटींचे उत्पन्न मिळवणार; आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळाने अडचणींनाच संधी मानून काम करण्याचे ठरवले आहे. 

- प्रसाद कानडेलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मालवाहतुकीच्या यशस्वी प्रयोगानंतर राज्य परिवहन महामंडळ नवा व्यवसाय सुरू करीत आहे. एसटी आता कुरिअर सेवा सुरू करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या एसटी गाड्यांच्या माध्यमातून पार्सल व कुरिअर पोहोचवले जाईल. कुरिअर सेवा ही केवळ गावखेड्यापर्यंतच असेल की, ती डोअर टू डोअर असेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पार्सल व कुरिअरच्या माध्यमातून एसटीने वर्षाला ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळाने अडचणींनाच संधी मानून काम करण्याचे ठरवले आहे. कोरोना महामारीत विपरीत परिस्थितीतदेखील मालवाहतुकीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्यामुळे आता व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पार्सल व कुरिअर सेवेचा अभ्यास करीत आहे. त्यासाठी अन्य राज्यांतीलदेखील महामंडळाच्या कामाचा आधार घेतला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भाग खेड्यापाड्यांत मिळून ६०० जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत. पार्सल व कुरिअरसाठी या जागेचा वापर केला जाणार आहे.

युपीचा फॉर्म्युला लागू करणार देशात उत्तर प्रदेशचे एसटी महामंडळ सर्वांत जास्त नफ्यात आहे. याचे कारण म्हणजे ७० टक्के प्रवासी वाहतूक व ३० टक्के अन्य माध्यमांतून  उत्पन्न मिळविणे. त्याचाच आधार घेत राज्य परिवहन महामंडळदेखील केवळ प्रवासी वाहतुकीतूनच नाही, तर अन्य माध्यमांतूनदेखील उत्पन्न मिळविणार आहे. 

पार्सल व कुरिअरची आमची योजना अंतिम टप्प्यात आहे. कुरिअर सेवा डोअर टू डोअर देण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. येत्या काही दिवसांत तो निर्णय होईल. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.    - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय     संचालक, परिवहन महामंडळ

एसटी फायद्यात राहण्यासाठी त्यांना उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधून त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. कुरिअर सेवेतून एसटीला चांगले उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.                -श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र     एसटी कर्मचारी काँग्रेस, मुंबई

टॅग्स :state transportएसटी