शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 06:41 IST

एसटीच्या जागांवर खासगी - सार्वजनिक भागीदारीतून विविध विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर ‘सौर ऊर्जा हब’ उभारणार आहे. त्यातून वार्षिक सुमारे एक हजार कोटी रुपये किमतीच्या म्हणजे ३०० मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य आहे. उत्पन्नाच्या या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितले. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

एसटीच्या जागांवर खासगी - सार्वजनिक भागीदारीतून विविध विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यातून उरलेल्या मोकळ्या जागांमध्ये ‘सौरऊर्जा’ निर्मिती करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सध्या एसटीला दैनंदिन वापरासाठी वर्षाला १५ मेगावॅट वीज लागते. त्यासाठी २५ ते ३० कोटी रुपये बिल महावितरणला भरावे लागते. 

शिवाय, भविष्यात हजारो इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी सुमारे २८० मेगावॅट विजेची गरज भासणार आहे. त्यामुळे ही वीज सौरउर्जेच्या माध्यमातून तयार केल्यास सुमारे १ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे सरनाईक म्हणाले.

स्वावलंबी होण्याकडे महामंडळाची वाटचाल

‘सौरउर्जा हब’साठी एसटी आपल्या मालकीच्या जागा वापरणार आहेच शिवाय शासनाकडून ओसाड जमिनी नाममात्र भाड्यावर घेणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदतही या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे  एसटीला आर्थिक अनुदानासाठी शासनाकडे वेळोवेळी हात पसरावे लागणार नाहीत, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

भविष्यात एसटीचा ‘सौरउर्जा हब’ प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी सौरउर्जा निर्मितीचा एक पथदर्शक प्रकल्प म्हणून ओळखला आणि नावाजला जाईल.-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : ST to Generate Electricity: 300 MW Solar Energy Target

Web Summary : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) plans solar energy hubs on its land, aiming for 300 MW annual generation. This initiative will save ₹1,000 crore annually and make MSRTC self-reliant, reducing reliance on government subsidies for electricity and future electric bus charging needs.
टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक