शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

Structural Audit; सीना नदीवरील कमानी पूल १२२ वर्षांनंतरही सेवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 15:25 IST

स्ट्रक्चरल आॅडिटचा पत्ता नाही; दोन वर्षांपूर्वीच गेला प्रस्ताव

ठळक मुद्दे१८९७ साली युरोप कन्स्ट्रक्शनने बांधलेला जुना कमानी पूल १५७.८५ मीटर लांबी व रुंदी ६ मीटर आहेपुलावरील वाहतूक वाढल्यामुळे शासनाने २०१३ साली या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्याचे काम हाती घेतलेकुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावर असणाºया रिधोरे-पापनसदरम्यान सीना नदीवरील जुन्या कमानी पुलाला १२२ वर्षे लोटली

इरफान शेख 

कुर्डूवाडी : कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावर असणाºया रिधोरे-पापनसदरम्यान सीना नदीवरील जुन्या कमानी पुलाला १२२ वर्षे लोटली. तरीही स्ट्रक्चरल आॅडिट झालेच नाही. पूर्वी रेल्वेच्या ताब्यात असलेला हा पूल नॅरोगेज बंद झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आला. २०१७ साली फेब्रुवारी ते जूनदरम्यान याचे इन्स्पेक्शन करुन स्ट्रक्चरल आॅडिटसाठी उपअभियंता यांनी पत्र दिले होते. मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही.

या पुलाच्या भिंतीवर आलेली झाडे- झुडपे काढून टाकणे, वरच्या बाजूला तुटलेले रेलिंग बसविणे, मध्यान्ह लाईन साफ करणे, काँक्रीट पिलरला जॅकेटिंगसाठी काँक्रिटिंग करणे, आर्चेसिंगचे मजबुतीकरण करणे, त्याची डागडुजी करणे, नाल्याचे पात्र साफ करणे अशा सूचना सुचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन मुख्य अभियंता यांना देण्यात आले. त्यानुसार २७ एप्रिल २०१९ रोजी स्वत: मुख्य अभियंता यांनी पाहणी केली़ त्यांच्या परीक्षणातून पुढे निर्णय घेतला जाणार आहे. 

पुलावरील वाहतूक वाढल्यामुळे शासनाने २०१३ साली या पुलाला समांतर दुसरा पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. हा नवीन पूल १७२ मीटर लांब, रुंदी ७.५ मीटर रुंदीचा असून, यात २८.७० मीटरचे ६ गाळे करण्यात आले आहेत. याचे ५ कोटींचे इस्टिमेटचे काम २०१६ साली पूर्ण झाले. मात्र त्याला अप्रोच रोड नव्हता, त्याचेही काम सध्या पूर्ण असून, यासाठी २ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यानुसार बार्शी काउंटर बाजूला फोल्डर बॉक्स रिटर्न बांधण्यात आले़ येत्या महिनाभरात कार्यान्वित होणार आहे.

पुलाचे बांधकाम १८९७ मधील १८९७ साली युरोप कन्स्ट्रक्शनने बांधलेला जुना कमानी पूल १५७.८५ मीटर लांबी व रुंदी ६ मीटर आहे. यात १४.३५ मीटरचे ११ गाळे होते. यात रेल्वे ट्रॅक २ मीटरचा व वाहतुकीसाठी ४ मीटरचा रस्ता होता. यावरुनच लातूर-मिरज नॅरोगेज रेल्वे गाडी धावायची. त्याच्या लगतच्या रस्त्यावरुन पुण्याहून मराठवाड्याकडे जा-ये करणारी वाहतूक याच पुलावरुन होत होती. रस्ता एकेरी असल्याने केवळ एकाच बाजूची वाहतूक होत होती. पूल ओलांडण्यासाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. मात्र नॅरोगेज रेल्वे बंद झाल्यानंतर २ मीटरचा ट्रॅक पत्रव्यवहार करुन ताब्यात घेण्यात आला. व त्यावर भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी वापरात आला होता.

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयpwdसार्वजनिक बांधकाम विभाग