शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक निष्कर्ष : बालमृत्यूमध्ये ६७ टक्केअनुसूचित जमातीची मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 05:36 IST

राज्यात नवजात शिशू काळजी कक्षात दाखल झालेल्या अर्भकांपैकी १० ते १५ टक्केअर्भके दरवर्षी मृत्यू पावत असून एकट्या नाशिक जिल्ह्याचा अर्भक मृत्यूदर ९ टक्के इतका आहे.

मुंबई : राज्यात नवजात शिशू काळजी कक्षात दाखल झालेल्या अर्भकांपैकी १० ते १५ टक्केअर्भके दरवर्षी मृत्यू पावत असून एकट्या नाशिक जिल्ह्याचा अर्भक मृत्यूदर ९ टक्के इतका आहे. जिल्ह्यात झालेल्या ५५ बालमृत्यूंमध्ये ६७ टक्केमुले अनुसूचित जमातीची आहेत. तर मृत शिशूंपैकी ७१ टक्के शिशू ग्रामीण भागातील आहेत आणि त्यातील ७२ टक्के मृत्यू हे केवळ कमी वजनाची मुले जन्माला आल्याने झाले आहेत, असे अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.ग्रामीण भागात व अनुसूचित जमातीसाठी सरकारतर्फे दिल्या जाणाºया सोयी-सुविधा प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतच नसून या योजना ठेकेदार आणि पुरवठादारांच्या दावणीला बांधल्या गेल्याचे स्पष्ट होत आहे.नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नेमलेल्या समितीने मुख्य सचिवांना पाठवलेल्या अहवालात नाशिक जिल्ह्यात मृत झालेल्या बालकांपैकी ८४ टक्के शिशू कमी वजनाचे, तर ५१ टक्के मूदतपूर्व प्रसूतीमुळे मृत झाल्याचे नमूद केले आहे. ३५ टक्के शिशू इन्क्यूबेटरचे तापमान वाढल्यामुळे गेले. मुळात खरेदी केलेले इनक्यूबेटर चांगल्या दर्जाचे होते की नाही, असे प्रश्न आता यातून उपस्थित झाले आहेत. यावर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, नवजात शिशू आजारी असेल तर त्याला इनक्यूबेटरमध्ये वातावरणातील तापमान, आर्द्रता व कमीत कमी संसर्ग टाळण्यासाठी ठेवले जाते. इनक्यूबेटर चांगल्या दर्जाचे असले तर असे प्रकार घडत नाहीत. मात्र मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करून अशा वस्तू खरेदी करून त्यात नवजात शिशू ठेवले आणि इनक्यूबेटरचे तापमान बिघडले तर ते दगावते. याचा अर्थ असे शिशू संसर्गामुळे मेले असा होत नाही, पण सोयीस्कररीत्या अशा वेळी इनक्यूबेटरच्या खरेदी आणि दर्जाबद्दल कोणी चर्चा करत नाही. ती झाली तर गंभीर बाबी समोर येतील, असेही डॉ. देशपांडे म्हणाले.अनुसूचित जमातीच्या मातांना महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जाणारे खाद्यपदार्थ आणि आरोग्य विभागातर्फे दिली जाणारी औषधे, हॉस्पिटलमधील साहित्य, त्यांच्या दर्जाविषयी व्यापक सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यातून अनेक घोटाळे समोर येतील, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार