शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

एनआरए, सीएए नको, उपासमारी दूर करा; राजस्तरीय सार्वजनिक हक्क परिषदेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 21:42 IST

महाराष्ट्रात २ कोटीहून अधिक लोक कुपोषित आहेत. ३० टक्के लोकाहून अधिकजण दारिद्ररेषेखाली जीवन जगत आहेत,

मुंबई - महाराष्ट्रात २ कोटीहून अधिक लोक कुपोषित आहेत. ३० टक्के लोकाहून अधिक जण दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, राज्य व केंद्र सरकारने त्यांना दर्जेदार शिक्षण व आरोग्य मिळवून देणे आवश्यक आहे, असा ठराव रविवारी सार्वजनिक हक्क अधिवेशनामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.‘मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर (एमपीजे)’च्या वतीने हज हाऊस येथे ही परिषद आयोजिण्यात आली होती. त्यामध्ये देशभरातील विविध संघटन, स्वयसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सैदुल्लाह हुसेनी होते. तर अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक प्रमुख उपस्थित होते.दिवसभरात दोन सत्रात झालेल्या अधिवेशनामध्ये देशात सध्या एनआरसी, सीएए नव्हे तर नागरिकांना उपासमारीपासून वाचविण्याची गरज आहे,असे मत अनेक तज्ञ व वक्तांची मांडले. ‘एमपीजे’चे प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज म्हणाले,‘ भारत हा जगातील ४५ देशांपैकी एक आहे जेथे उपासमारीची समस्या गंभीर आहे. राज्यातील दारिद्रय दर १८ टक्के आहे,’ प्रा.सय्यद मोहसीन म्हणाले की, सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचे उत्पादन एक मोठी समस्या बनली आहे. आमच्या मुलांना दजेर्दार शिक्षण मिळत नाही.या सर्वेक्षण अहवालानुसार पाचव्या वगार्तील सुमारे ७० टक्के मुलांना अंकगणित गणना करता येत नाही. ४० टक्के विद्यार्थी शब्द ओळखून उच्चारू शकत नाहीत.कुमकुवत मुले नववीत नापास होतात आणि ही शाळा सोडणारी मुले एकतर असामाजिक कार्यात गुंततात किंवा असंघटित क्षेत्रात दिसतात. राज्यातील आरोग्याच्या सद्यस्थितीबद्दल डॉ. अभिजीत यांनी सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा आजारी पडल्याचे आकडेवारीनिशी नमूद केले.केवळ २० लोक राज्यातील सरकारी रुग्णालयात जातात, उर्वरित लोक महागड्या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी भाग पडतात. कामगार चळवळीचे कार्यकर्ते मधुकांत पठारिया यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कल्याण व हक्क यावर मार्गदर्शन केले. या अधिवेशनात लोकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल जनसुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील गायत्री सिंह आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसचे प्रा.महेश कांबळे यांनी केला. या सत्राचे मुख्य वक्ते व माजी आयएएस अधिकारी हर्ष मंदार यांनी देशातील सार्वजनिक हक्कांच्या वितरणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोक हक्कांच्या प्राप्तीबद्दल मार्गदर्शन केले.