शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त घर योजनेला हरताळ

By admin | Updated: May 19, 2016 02:54 IST

शासनाच्या स्वस्त घर योजनांना सिडको व्यवस्थापनाने हरताळ फासला आहे.

नवी मुंबई : शासनाच्या स्वस्त घर योजनांना सिडको व्यवस्थापनाने हरताळ फासला आहे. नैना परिसरातील प्रकल्प तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक रखडविले जात आहेत. व्यावसायिकांची अडवणूक सुरू असून, प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत आहेत. एनए एनओसीसाठीही दोन वर्षे हेलपाटे घालावे लागत आहेत. नैना कार्यालयामध्ये काही अधिकाऱ्यांची मनमानी व हुकूमशाही सुरू असून, त्याचा विकासावर परिणाम झाला असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्येनंतर नैना परिसरामध्ये विकासकांची अडवणूक होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नैना परिसराच्या नियोजनाची जबाबदारी शासनाने सिडकोवर सोपविल्यापासून तीन वर्षांत फक्त २९ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दोन ते तीन वर्षे प्रकल्पांची मंजुरी दिली जात नाही. अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीची माहिती देण्यासाठी व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अशोक छाजेर यांनी नैना कार्यालयामध्ये वेणू गोपाल व आशुतोष निखाडे या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप केला. तीन वर्षांपासून बांधकाम परवानगी मिळावी, यासाठी नैना कार्यालयामध्ये वारंचार फेऱ्या मारत आहोत. मंजुरीसाठी आवश्यक अग्निशमन कार्यालयाचे शुल्क, एमएमआरडीए, जिल्हा अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, तहसीलदार, ग्रामपंचायत या सर्र्वांच्या परवानग्या व ना-हरकत प्रमाणत्र दिले; परंतु त्यानंतरही तीन वर्षांत परवानगी दिली नाही. प्रत्येक वेळी नवीन त्रुटी काढून मानसिक त्रास दिला. सिडकोच्या कारभाराविरोधात आवाज उठविल्यामुळे वेणू गोपाल यांनी आम्ही अतिरिक्त चटईक्षेत्र मागत असल्याचा आरोप केला. लिफ्ट बसविण्यासाठी नकार दिला जात आहे व इतर आरोप केले जात आहेत, परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एमएमआरडीएने रेंटल हाऊस योजनेसाठी विशेष नियमावली केली असून, त्यानुसारच चटईक्षेत्राची मागणी केली आहे. विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक असलेल्या मार्जिनल ओपन स्पेसपेक्षा कमी अंतर असल्याने परवानगी नाकारली असल्याचा दावा सिडकोने केला आहे. परंतु याच कार्यालयाने अशाप्रकारे एका प्रकल्पास परवानगी दिली आहे. नियमावलीप्रमाणे सामाजिक भूखंडासाठी १२ मीटर रुंदीचा रस्ता आवश्यक असल्याचा नियम दाखवत आहेत. परंतु याच विभागाने नऊ मीटर रस्ता असणाऱ्या प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे. विकासकांकडून इमारत पूर्ण झाली तरी भौतिक सुविधा मागणार नाही, असे लिहून घेतले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजेश प्रजापती, प्रकाश बाविस्कर, इजराईल शेख, मनोहर श्रॉफ, विजय लखानी व इतर बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. ।१५० कोटींचे नुकसाननैना क्षेत्रामध्ये रेंटल हाऊस योजनेअंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. या प्रकल्पांतर्गत शासनाला तब्बल १,४७४ वन बीएचकेची घरे मोफत देण्यात येणार होती. परंतु प्रकल्प रखडविल्याने शासनाचे जवळपास १५० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे अशोक छाजेर यांनी स्पष्ट केले. ।सरकारचे आदेश धाब्यावर महाराष्ट्र शासनाने जुलै २०१५ मध्ये गावठाण विस्तार क्षेत्रामध्ये चौथ्या मजल्याला परवानगी देण्याचे आदेश जुलै २०१५ मध्ये दिले आहेत. शासनाने आदेश दिल्यानंतरही अद्याप एकही परवानगी दिलेली नाही. प्रकल्पग्रस्तांचीही अडवणूक केली जात असल्याचा आरोप विकासकांनी केला आहे.।करोडोंचे नुकसान नैना क्षेत्रामधील प्रकल्प तीन वर्षांपासून रखडविले जात आहेत. यामुळे या परिसरामध्ये केलेली गुंतवणूक गोठली आहे. प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे. सिडकोच्या अडवणुकीच्या धोरणामुळे गुंतवणूक करणाऱ्या विकासकांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.