शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनावर वादळी ढग, विरोधकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:41 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि आमच्याकडे विरोधकांच्या हल्लाबोल नव्हे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि आमच्याकडे विरोधकांच्या हल्लाबोल नव्हे, ‘डल्लामार’ यात्रेचे भरमसाट पुरावे असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला इशारा लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरणार असे दिसते.मुख्यमंत्र्यांचा मोबाइल तपासाभाजपाचे नेते मुन्ना यादव हे फरार आहेत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे. यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचा सीडीआर तपासा, म्हणजे यादवांचे लोकेशन कळेल, असा चिमटा मुंडे यांनी काढला.भाजपा, उद्धव हेच लाभार्थीकोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती केल्या आहेत. मात्र, भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विरोधकांनी केली.राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे या विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या तीन वर्षांत सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप केला.सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा...’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. भाजपाच्या खासदार, आमदारांमध्येही खदखद आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या विविध मंत्र्यांचे विविध घोटाळे आम्ही बाहेर काढले. गुजरातमध्ये जसा ‘विकास’ पागल झाला आहे, तशी महाराष्ट्रात ‘पारदर्शकता’ पागल झाली आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार