ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 22- मोताळा तालुक्यातील धामणगाव बढेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम नांद्रा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अचानक आलेल्या वादळामुळे विनोद चव्हाण यांच्या घरावरील छत अंगणात कोसळले. यावेळी अंगणात त्यांची दोन मुले खेळत होती, तर १२ दिवसांचा एक मुलगा झोक्यात होता. यावेळी छत कोसळल्यामुळे तिन्ही मुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिका-यांनी १२ दिवसांच्या मुलास मृत घोषित केले. तर दोन्ही जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत.
वादळामुळे छत कोसळले, १ मुलाचा मृत्यू, २ गंभीर
By admin | Updated: April 22, 2016 17:56 IST