अधिवेशनावर जमले वादळी ढग!

By Admin | Published: July 13, 2015 02:09 AM2015-07-13T02:09:43+5:302015-07-13T02:09:43+5:30

राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट असले तरी सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

The storm clouds gathered at the convention! | अधिवेशनावर जमले वादळी ढग!

अधिवेशनावर जमले वादळी ढग!

googlenewsNext

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाचे सावट असले तरी सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे, तर विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांची १७ प्रकरणे भाजपानेही आपल्या भात्यात ठेवली आहेत. सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर रविवारी बहिष्कार टाकून विरोधकांनी पहिली चाल खेळली आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, एमआयएम, सपा या पक्षनेत्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचा निर्णय झाला. याबाबतची घोषणा करताना विखे-पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. आठ महिन्यांत १,५७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही संवेदनाशून्य सरकार त्याची दखल घेत नाही, अशी टीका केली.
--------------------
विरोधकांना चोख उत्तर देऊ
विरोधकांच्या या भूमिकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. विरोधकांनी गोंधळ घालण्यापेक्षा मुद्दे उपस्थित करावे, त्याला समर्थपणे उत्तर देण्यास सरकार तयार आहे. सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करताना विरोधकांनी पुरावे द्यावे. त्यामध्ये तथ्य असल्यास सरकार कुठल्याही चौकशीला तयार आहे.

(विशेष प्रतिनिधी)

Web Title: The storm clouds gathered at the convention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.