शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 05:40 IST

ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी शासनाने सर्वसमावेशक असे धोरण तयार केले असून, ते अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई - मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असलेल्या ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी परिवहन विभागाने  दर निश्चित केले असून ते १८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. असे असताना ओला, उबर, रॅपिडसारख्या कंपन्यांनी अजूनही ॲपवर सरकारमान्य दर लागू न करता मनमानी भाडे आकारणी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आरटीओने ठरवून दिलेले दर लागू केले नाहीत तर त्या कंपन्यांवर त्यांचे प्रोव्हिजनल लायसन्स रद्द करण्याची कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. 

ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी शासनाने सर्वसमावेशक असे धोरण तयार केले असून, ते अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचे नियम निश्चित झाल्यास वाहनांच्या किमतीनुसार ॲपवर आधारित वाहनांचे भाडे निश्चित करण्यात येणार आहे. सरकारमान्य भाडे लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिवहन विभागाने कंपन्यांना प्रोव्हिजनल परवाना दिला आहे तसेच प्रतिकिमी २२.७२ रुपये भाडे ठरवून दिले आहे तर मागणी आणि मागणी नसलेल्या कालावधीत भाडे कमी-अधिक करण्याची सवलतही दिली आहे परंतु, कंपन्यांनी ॲपवर ते लागू न केल्याने चालकांनी मंगळवारपासून स्वतःहून परिवहन विभागाने निश्तित केलेल्या दरानुसार भाडे आकारणी सुरू केली आहे. याबाबत परिवहन विभागाला विचारले असता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

चालकांचा पुढाकार मात्र, प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद; वादाचे प्रसंगभारतीय गिग कामगार मंचाने चालकांना ठरावीक दरांनुसार भाडे आकारण्याचे आवाहन केले आहे. ‘लोकमत’ने याबाबत चालकांशी संवाद साधला असता, प्रवाशांचा प्रतिसाद वेगवेगळा असल्याचे दिसून आल्याचे सांगितले.  काही प्रवासी आरटीओच्या दरानुसार भाडे देण्यास तयार झाले, तर काहींनी ॲपवर दिसणाऱ्या भाड्यानुसारच प्रवास करणे पसंत केले.  या विरोधाभासामुळे काही ठिकाणी प्रवासी व चालक यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवले. त्यामुळे अनेक चालकांनी वाद टाळण्यासाठी आम्ही फक्त ॲपवर दिसणारेच दर आकारतो, असे सांगितले.

चालक प्रवाशांमध्ये प्रवास भाड्यावरून वाद होत आहेत. हा वाद टाळण्यासाठी आम्ही ॲपवर दिसत असलेले दरच आकारण्याला प्राधान्य देत आहोत. - सुधीर पाटील, चालक 

आम्हाला चालकांनी सांगितल्यानुसार दर द्यायला हरकत नाही परंतु ऑफिसमध्ये बिल मागितल्यावर आमची अडचण होऊ शकते. त्यामुळे सध्यातरी ॲपवर दिसत असलेले भाडेच देऊ. - निशांत पाटील, प्रवासी

कंपन्यांकडून नियमांचे जर उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो. - विवेक भीमनवार, राज्य परिवहन आयुक्त

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसOlaओलाUberउबर