शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या दिवशी दगडफेक; पोलीसांच्या कारवाईच्या निषेधार्थ कडकडीत बंद

By अनिल गवई | Updated: August 29, 2022 11:57 IST

बैल पोळ्याच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला.

खामगाव:

बैल पोळ्याच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. शैक्षणिक संस्थांसह किरकोळ विक्रेतेही खामगाव बंदमध्ये सहभागी झाले. सोमवारी मस्तानचौकासह मुख्य रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सकाळी १० वाजता शहरातून कारवाईच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली.

पोळ्याच्या दिवशी बैलाच्या छेडखानीतून दोन गटात वाद् उद्भवला होता. या वादातून दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचा तपास चुकीच्या दिशेने करीत, निरपराधांवर कारवाई केली. ही कारवाई मागे घेण्यात यावी. दगडफेक झाल्याचा कारणाचा शोध घेण्यात यावा. त्याचप्रमाणे घडलेल्या घटनेला जबाबदार असलेल्या तीन पोलीस अधिकाºयांना गणेशोत्सव काळात शहराबाहेर ठेवण्यात यावे, गणशोत्सव काळात जबाबदार आणि चांगल्या अधिकाºयांची खामगावात नियुक्ती करण्यात यावी यासह आदी मागण्यांच्या निषेधार्थ खामगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी १० वाजता शहराच्या विविध भागात हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले. गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनीही या रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दगडफेकीच्या कारणांचा शोध घ्यावा!- पोळ्याच्या दिवशी घडलेल्या दगडफेक प्रकरणी योग्य कारणांचा शोध न घेताच घाई गडबडीने पोलीसांनी कारवाई केली. निरपराध लोकांना अटक केली. वस्तुस्थितीत बैलांची छेड आणि खेळण्यातील नोटा भिरकावनेच घटना घडली. मात्र, मुख्य  कारण गुलदस्त्यात ठेवत पोलीसांनी एकतर्फी केल्याचा आरोप खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केला आहे.

हिंदुत्व संघटनांची रॅली- पोलीस कारवाईच्या निषेधार्थ गांधी चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मोटार सायकल रॅलीद्वारे शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र