शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंच्या सभेवर दगडफेक, अंबादास दानवेंचं पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र, केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:45 IST

Ambadas Danve : आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती. या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरणात सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी करत पोलीस महासंचालकांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

या पत्रात अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याती महालगाव येथे ही यात्रा आली. तेव्हा तेथील ग्राम सचिवालयासमोरील मैदानावर सभा सुरू असताना तिथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तसेच सभा संपवून तिथून निघतानाही आदित्य ठाकरे यांच्या कारवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चाल करून आला. सदर प्रकरणात सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. त्याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांचा मतदासंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरेंच्या सभेत मोठा राडा झाला. सभेवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सभा संपवून निघताना आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि गाडीवरही दगडफेक करण्यात आली. मंगळवारी माता रमाई यांची जयंती असल्याने गावात पूर्व नियोजित मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले. मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे कारमध्ये बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदीबस्तात आदित्य यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले. आदित्य ठाकरे गेल्या नंतर बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस