- संकेत सातोपे, मुंबई मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. आज जागतिक लोकशाही दिनानिमित्त आढावा घेतला असता, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या १६ निवडणुकांमध्ये कधीही ७० टक्के मतदारांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते.गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ६६.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या आधीच्या २००९ सालच्या निवडणुकीत केवळ ५८.१९ टक्के लोकांनी मतदान केले होते. स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या दोन निवडणुकांमध्येच झाल्याचे दिसते. १९५१च्या सार्वत्रिक निवडणुकीत ४४.८७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे १८५७ सालच्या निवडणुकीमध्ये ४५.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान राहिली आहे.जागतिक लोकशाही दिन विशेष : २०१४ला सर्वाधिक ६६ टक्के मतदानएकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55-58% - मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच अद्याप जवळपास निम्मा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहे. त्यातही नोंदणी झालेली नसलेल्या पात्र नागरिकांची गणना केलेली नाही अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. आता इतक्या मोठ्या वर्गाला मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे आव्हान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.
अजूनही ३५% लोक मतदानापासून दूर
By admin | Updated: September 15, 2015 01:30 IST