शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

स्टीफनला रक्तदानाने श्रद्धांजली

By admin | Updated: July 21, 2016 03:40 IST

मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीफन मिनेझीस याला त्याच्या पहिल्या स्मृतीदिनी रक्तदान आणि वृक्षारोपण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.

वसई : नानभाट येथील समाजमित्र आणि मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीफन मिनेझीस याला त्याच्या पहिल्या स्मृतीदिनी रक्तदान आणि वृक्षारोपण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.१९ जुलैला त्याच्या देहरुपी जाण्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमीत्त स्टीफन मिनेझीस मित्र परिवार मंडळाने रविवारी विविध र्काक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी त्याचे वडील फ्रान्सिस यांच्या हस्ते वृक्षरोपणाने सुरवात करण्यात आली. त्यानंतर बोळींज ते नानभाट या रस्त्यावर नागरिकांनी वृक्षारोपण केले. यावेळी सर्व रोपट्यांची जोपासना करून त्यांची पूर्ण वाढ करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली. १० वाजता रक्तदान शिबीरात ९२ जणांनी रक्तदान करून स्टीफनला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विद्याविहार ट्रस्ट केळवण आणि चुळणे येथील फातिमा माता येथील ७० अनाथ मुलींसोबत स्रेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी स्टीफनचे कार्य कथन करतानाच, विद्यार्थ्यांचे मनोरंजनही करण्यात आले. यावेळी स्टीफनच्या स्मरणार्थ भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. (प्रतिनिधी)।कोण होता मिनेझीस?नानभाट येथील स्टिफन मिनेझीस हा तरूण एअरटेल कंपनीत नोडल आॅफीसर म्हणून कार्यरत होता. या पदावर काम करताना त्याने अनेक गंभीर गुन्ह्यात पोलीसांना मदत केली होती. त्याच्या मदतीमुळे अशक्यप्राय वाटणारे अनेक गुन्हे मुंबई पोलीसांनी उघडकिस आणले होते. त्यामुळे तो जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखला जात होता. कोणतीही समस्या स्टीफन जनसंपर्कामुळे लीलया सोडवायचा. त्यामुळे त्याचा परिवार खूप मोठा होता. ग्रामस्थांना तोच एक मोठा आधार होता. आपल्या वसई तालुक्यातून किमान १० धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे. असे त्याचे स्वप्न होते. तो स्वत: एक उत्तम धावपटू होता. अनेक स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली होती.गेल्या वर्षी १९ जुलैला मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावतांना हृदयविकाराने त्याचे निधन झाले. या बातमी कळल्यावर वसई तालुक्यातच नव्हे तर त्याच्या मुंबईतील मित्र परिवारात शोककळा पसरली. त्याने केवळ ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेताना स्टीफनने आपला आदर्श लोकांपुढे ठेवला. लोकांसाठी जगा,त्यांच्या समस्या सोडवा. असा संदेश देतानाच त्याने वसई तालुक्यात आपल्या मित्र परिवारातर्फे अनेक उपक्रम राबवले होते. मृत्युनंतर त्याच्या इच्छेनुसार नेत्रदानही करण्यात आले.