शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या १२ तासांत स्थगिती, गृहखात्याचा अजब कारभार; कुणाचं प्रमोशन थांबवलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:39 IST

राज्याच्या पोलीस पदोन्नतीचा आदेश जारी होऊन अवघे १२ तासही झालेले नसताना गृहखात्यातून काल रात्री जारी केलेले आदेश तातडीनं स्थगित करण्यात आले आहेत.

मुंबई-

राज्याच्या पोलीस पदोन्नतीचा आदेश जारी होऊन अवघे १२ तासही झालेले नसताना गृहखात्यातून काल रात्री जारी केलेले आदेश तातडीनं स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. स्थगितीच्या आदेशामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण पोलीस बदली आणि पदोन्नतीचा आदेश जारी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीच्या आदेशावर स्थगिती देण्याची वेळ गृहखात्यावर का आली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे. यात एकूण पाच पोलिसांची पदोन्नती थांबविण्यात आली आहे. राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नतील पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तसंच पत्रकच राज्याच्या गृहखात्याकडून जारी करण्यात आलं आहे. पोलीस बदलीचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

कोणत्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन थांबवलं? 

१. राजेंद्र माने- विद्यमान पद- उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबईपदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर

२. महेश पाटीलविद्यमान पद- पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार-पोलीस आयुक्तालय पदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई

३. संजय जाधवविद्यमान पद- पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणेपदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर

४. पंजाबराव उगलेविद्यमान पद- पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणेपदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, मुंबई

५. दत्तात्रय शिंदेविद्यमान पद- पोलीस अधिक्षक, पालघरपदोन्नती पद- अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई

गृहविभागानं जारी केलेलं पत्रक-

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMumbai policeमुंबई पोलीस