शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'पुस्तकांचे गाव ' ला योजनेचा दर्जा : आगामी काळात योजनेची व्याप्ती वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:06 IST

मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली.

ठळक मुद्देपुस्तकांच्या गावातील विविध दालनांना वाचक आणि पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणावर भेटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमाला योजना म्हणून कार्यान्वित करण्यास मान्यता

नम्रता फडणीसपुणे : 'हे ऑन वे ' या वेल्स ( इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर भिलार येथे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या 'पुस्तकांचे गाव ' या उपक्रमाला योजनेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आगामी काळात या योजनेची व्याप्ती वाढविली जाणार आहे.  हा उपक्रम योजनेच्या स्वरूपात कार्यान्वित झाल्यामुळे मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय तो बंद करता येणार नाही. मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली. त्यानुसार  तेथील स्थानिक जनतेच्या सहभागातून वाडमयातील विविध विषयानुरूप पुस्तकांची दालने विकसित करण्यात आली.  4 मे 2017 रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  शासन आणि लोकसहभागातून साकार झालेल्या पुस्तकांच्या गावातील विविध दालनांना दोन वर्षात वाचक आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या . 'पुस्तकांचे गाव'ला मिळत असलेला हा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन  हा उपक्रम स्वतंत्रपणे योजना म्हणून राबविण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमाला योजना म्हणून कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी  ' लोकमत' शी बोलताना दिली.ते म्हणाले, या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्षकांतर्गत सुमारे दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, योजनेच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहायक, कार्यालयीन सहायक, लिपीक टंकलेखक आणि शिपाई अशा पदांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन पुस्तकांचे गाव भिलार येथे आगामी काळात अधिक व्यापक दृष्टीकोनातून विविध साहित्यिक उपक्रम, साहित्य प्रकाशन, कार्यशाळा तसेच पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, साहित्य जत्रा, मान्यवर साहित्यिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.तसेच  पर्यटकांच्या सोयीसाठी खुल्या प्रेक्षागृहाचे व्यवस्थापन, समूह निवा-याची सोय, स्वच्छतागृहाचे बांधकाम, वाहनतळ, रस्ते दुरूस्ती, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. कोणताही उपक्रम पाच ते सहा वर्ष चालविला तर तो बंद करता येणे शक्य होते. पण आता या उपक्रमाचे रूपांतर योजनेमध्ये झाल्यामुळे तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय बंद करता येणार नाही. ----------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यGovernmentसरकार