शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे नवे सागरी विकास धोरण लवकरच

By यदू जोशी | Updated: June 23, 2023 07:14 IST

२०१९ मध्ये धोरणात काही दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. मूळ धोरणाची मुदत २०२१ मध्येच संपली होती. 

मुंबई : राज्य सरकार लवकरच नवे सागरी विकास धोरण आणणार आहे. त्यात, भाडेपट्ट्यावर जमिनी देतानाच्या सवलती, फ्लोटेल्सच्या, ॲम्फिबियन बसेस, हाऊस बोटस् आणि सीप्लेन्सच्या तिकीट दरात सवलत आदींचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या धोरणाला मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 खासगी बंदरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग अशा सुविधा निर्माण करणे, क्रूझवर सवलती देणे आदींचा या धोरणात समावेश असेल. शेजारच्या गुजरातशी स्पर्धा करताना सुविधा आणि सवलतींचे पॅकेज देण्यावर भर असेल. हे धोरण पाच २०२८ पर्यंत लागू असेल. यापूर्वी २०१६ मध्ये तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने असे धोरण आणले होते. २०१९ मध्ये धोरणात काही दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. मूळ धोरणाची मुदत २०२१ मध्येच संपली होती. 

समुद्रातील लाईट हाऊसेस तसेच पर्यटन स्थळांचा विकास, वॉटर स्पोर्ट्स आणि इतर  सुविधांची उभारणी करणे, तीन वर्षांसाठी प्रवाशांना क्रूझच्या तिकीट दरात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत, बंदरांच्या वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात २५ टक्के सवलत ही या धोरणाची आणखी काही वैशिष्ट्ये असतील. फ्लोटेल्स, सी प्लेन, हाऊसबोट्सना चालना देण्यासाठी  प्रवासी आणि मालक या दोघांनाही सवलतींचे पॅकेज दिले जाणार आहे. 

- खासगी बंदरांच्या मालकांना सवलती देण्याचेही या धोरणात प्रस्तावित आहे. या बंदरांपर्यंत जाणारे रस्ते बांधण्यासाठी ५० टक्के अर्थसहाय्य राज्य सरकार करेल. या बंदरांना रेल्वेने जोडले जावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल. - कच्चा माल आणि तयार वस्तूंची वाहतूक समुद्रामार्गे व्हावी यावर धोरणात भर देण्यात आला आहे. - नवीन जहाजांची बांधणी आणि जुन्या जहाजांच्या काही सुट्या भागांचा वापर करून पुन्हा त्यांची उभारणी करणे यासाठीही सवलती दिल्या जातील. बोटी उभ्या करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म (मरिना) उभारण्यासाठीची जागा ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जातील.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र