शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

राज्याच्या शेतीची प्रकृती नाजूक! कृषी उत्पादन घटले

By अतुल कुलकर्णी | Updated: March 9, 2018 05:13 IST

शेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट झाली असून, शेतीची प्रकृती नाजूक असल्याचे वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

 मुंबई  - शेतीच्या शास्वत विकासासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा सरकार करत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादनात कमालीची घट झाली असून, शेतीची प्रकृती नाजूक असल्याचे वास्तव आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी कृषी व ग्रामीण विकासावर भर दिला होता. तसाच राज्याच्या अर्थसंकल्पातही भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.२०१७च्या खरीप हंगामात १५०.४५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत लागवडीखालील क्षेत्र वाढले असताना उत्पादन मात्र घटले आहे. खरिपासाठी ८.१ टक्के तर रब्बीसाठी १६.९ टक्के बियाणे कमी दिले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.गारपीट, बोंडअळी आणि अनियमित पावसामुळे यंदा पिके वाया गेली. यावर्षी उत्पादनवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणार आहोत. निसर्गाची साथ मिळाली तर त्याचे चांगले परिणामही दिसतील, असेही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.दरडोई उत्पन्नात वाढराज्य अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.३ टक्के इतका कायम ठेवण्यात सरकारला यश असून, तो देशाच्या ६.५ टक्के वृद्धीदरापेक्षा अधिक आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.राज्याच्या दरडोई उत्पन्नात१२.१ टक्के वाढ झाली असून ते १ लाख ८० हजार ५९६ रुपये इतके झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थव्यवस्थेची वाढ दोन अंकी म्हणजे १० टक्के इतकी झाली आहे.महागाईचा दर नियंत्रित ठेवण्यात सरकारला यश आले आहे. नागरी भागासाठी २.१ टक्के तर ग्रामीण भागासाठी १.८ टक्के इतका महागाई दर राहिला.उसाखालील क्षेत्र वाढलेयंदा तृणधान्ये ४ टक्के, कडधान्ये ४६ टक्के, तेलबिया १५ तर कापसाचे उत्पादन ४४ टक्के कमी झाले आहे. एवढेच नाही, तर भाजीपाल्याचे उत्पादनही १४ टक्क्यांनी आणि फळबागांचे उत्पादन ६ टक्क्यांनी घटले आहे. उसाच्या उत्पादनातमात्र २५ टक्के वाढ झाली आहे.‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ असे धोरण कसे परवडेल? काँग्रेसला दोष देण्यापेक्षा त्यांची चुकीची धोरणे या सरकारने बदलायला हवी होती. पावसाने साथ दिली नाही; पण उसाला जेवढे सरकारी संरक्षण दिले जाते तेवढे अन्य पिकांना का दिले जात नाही?- विजय जावंधिया, कृषितज्ज्ञगेल्या साडेतीन वर्षांत तिस-यांदाशेती उत्पादन घटले आहे. शास्वत शेतीच्या नावाखाली सरकारने दोन लाख कोटींची गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. मग शेतीचे उत्पादन का घटले? या सगळ्याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी झाली पाहिजे.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी