शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:42 IST

मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

मुंबई / माणगाव : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भिराचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले असून, मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. बुधवारसह गुरुवारी वाढत्या कमाल तापमानासह कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढ होणार आहे. वातावरणातल्या या ‘ताप’दायक बदलाने संपूर्ण महाराष्ट्र तापला असल्याचे चित्र आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शुक्रवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.>भिरा ४२ अंशावर : रायगड जिल्ह्यातील भिरा येथे शुक्रवारी सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१७ मध्ये रायगड जिल्ह्यातील भिरा येथे नोंद करण्यात आलेल्या ४६.५ अंश सेल्सिअस अशा देशातील उच्चतम तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी येथील तापमान ४०.५ सेल्सिअस होते. शुक्रवारी ते ४० अंश सेल्सिअस इतके होते. तर, मंगळवारी भिरा येथे सर्वाधिक अशा ४२ अंश सेल्सिअस झाल्याची माहिती मुंबई येथील मेट्रॉलॉजिकल विभागाने दिली आहे. यापूर्वी २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक अशा ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात