शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्यात तीन महिन्यांत १६ हजार विहिरी, सिंचन क्षेत्र वाढीस मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:08 IST

मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला.

 - विशाल सोनटक्के नांदेड - मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. नांदेडमध्ये तीन महिन्यात ८८६ विहिरींचे म्हणजेच उद्दिष्टांच्या ६६.७७ टक्के काम पूर्ण झाले आहे.समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरींची कामे करण्यात येतात. ३१ मार्च अखेर राज्यात ४१ हजार ६६१ विहिरींची कामे पूर्ण झाली होती तर ७६ हजार ६८९ विहिरींची कामे प्रगतीपथावर होती. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींच्या कामांचा आढावा घेतला असता काही विहिरींचे काम २५ टक्के, काहींचे ५० तर काहींचे ७५ टक्के काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. यावर रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी अपूर्ण विहिरींच्या कारणांचा शोध घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणीचे निराकरण करा, अशी सूचना करीत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे आदेश होते. यानुसार प्रगतीपथावरील ७५ टक्के काम झालेल्या विहिरी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्यानंतर ५० टक्के काम झालेल्या विहिरींचे काम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. सदर मोहीम राज्यभरात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले.एप्रिल, मे आणि जून या कालावधीत राज्यभरातील अपूर्ण विहिरींच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. महिनानिहाय प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार रोहयोच्या माध्यमातून राज्यभरात विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. एप्रिलमध्ये राज्यभरात ४ हजार ७५५ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली तर मे महिन्यात ६ हजार ३२ विहिरी पूर्ण झाल्या. जूनमध्येही विहिरींच्या पूर्णत्वाचा हा कार्यक्रम सुरूच होता. या महिन्यात ५ हजार ३६० विहिरी बांधण्यात आल्या. यानुसार मागील तीन महिन्यात राज्यात १६ हजार १४७ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक १ हजार ९७० म्हणजेच उद्दिष्टाच्या ८६.५२ टक्के विहिरींची कामे पूर्ण करुन राज्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा राहिला.कोटसिंचन विहिरींची अपूर्ण असलेली जास्तीत जास्त कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य होते. यासाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतल्याने जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत ९६१ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले. किनवट, लोहा, माहूरसह नायगाव तालुक्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.-कल्पना क्षीरसागरउपमुख्य कार्यकारी अधिकारीमनरेगा, नांदेड.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNandedनांदेड