मुंबई/पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पडणारा मुसळधार पाऊस मंगळवारी कायम होता. मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, विदर्भात जोरदार पाऊस झाला. पंचगंगेला पूर आल्याने कोल्हापूरचा शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आलेआहे. उर्वरित राज्यातही दमदार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली़ कोल्हापूर, सांगली, सातारा भागात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. पंचगंगा नदीने धोक्याची ४३ फुटांची जलपातळी ओलांडली असून महापुराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूरचा सुमारे शंभराहून अधिक गावांचा तसेच तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. सांगलीत कृष्णेचे पाणी पात्राबाहेर पडले. शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिराळ्यात मोरणा नदीसही पूर आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या अकरा जणांपैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाबळेश्वरात धुवांधारगेल्या २४ तासांत राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक २८७ मिमी पावसाची नोंद झाली़ तसेच किनवट १७५, तलासरी १३६, माहूर १२६, भिरा ११०, हरणाई ८९मिमी पाऊस झाला़ घाटमाथावरील कोयना (नवजा) ३४०, दावडी २२०, शिरगाव २०, ताम्हिणी १८०, डुंगरवाडी, कोयना (पोफळी) १४०, खंद १२०, भिरा ११०, अम्बोली १००, लोणावळा ८० मिमी पाऊस झाला़मुसळधार पावसाचा इशारापुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रा,कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यात मुसळधार कायम!
By admin | Updated: July 13, 2016 04:12 IST