शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राज्यातील टोल नाक्यांना मुद्रांक शुल्क वसुलीचे नोंदणी महानिरीक्षकांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 11:42 IST

कोरोना व लाॅकडाऊनमुळे राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्देनोंदणी महानिरीक्षकांची टोल कंपन्यांना 202 कोटी भरण्याचे आदेश 

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे :  राज्य भरातील टोल कंपन्यांमार्फत दरवर्षी विविध स्वरूपाचे अनेक इतर खाजगी कंपन्यां, सरकार सोबत करार केले जातात. या सर्व करारावर कायद्यानुसार 0.2 टक्के रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून शासनाला जमा करणे बंधनकारक आहे. परंतु राज्यातील बहुतेक सर्व टोल नाक्यांवर हा कायदा धाब्यावर बसवत मुद्रांक शुल्क भरले नसल्याचे समोर आले आहे. यासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी सर्व टोल नाक्यांना मुद्रांक शुल्क वसुलीचे आदेश दिले आहेत. या सर्व टोल कंपन्यांनी थकीत तब्बल 202 कोटी रुपयाचा मुद्रांक शुल्क तातडीने भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. 

कोरोना व लाॅकडाऊनमुळे राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या नोंदणी  व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने आतापर्यंत दुर्लक्षित असलेले सर्व घटक कराच्या कक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याचच एक भाग म्हणून आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवर विविध टोल कंपन्यांकडून सरकार व अन्य खाजगी संस्था सोबत करण्यात येणा-या सर्व करारांवर कायद्यानुसार 0.2 टक्के प्रमाणे मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. काही टोल कंपन्यांमार्फत हे मुद्रांक शुल्क शासनाला भरण्यात येते. परंतु बहुतेक टोक कंपन्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दर वर्षी करण्यात येणा-या करारांवर मुद्रांक शुल्क भरणे टाळले जाते. याची सर्व माहिती नोंदणी महानिरीक्षकांची काढली असून,  आता सर्व करार कायद्यानुसार मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. -------सर्व प्रकारच्या करारांवर मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक राज्य शासनाच्या स्टॅम्प ड्युटी कायद्यानुसार सर्व प्रकारच्या करारांवर मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे. परंतु अनेकांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. आता राज्यातील सर्व टोल नाके व संबंधित कंपन्यांना कायदेशीर नोटीसा काढण्यात आल्या आहेत. सरकार अथवा खाजगी कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींसोबत झालेल्या सर्व प्रकारच्या करारावर स्टॅम्प ड्युटी कायद्यानुसार 0.2 टक्के मुद्रांक शुल्क जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात आतापर्यंत संबंधित टोल कंपन्यांना तब्बल 202 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क तातडीने जमा करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.- ज्ञानेश्वर खिलारी, सह नोंदणी महानिरीक्षक

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार