शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

शासनातर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: March 4, 2017 05:11 IST

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. राज्य पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्तीस ५० हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार १ लाख रुपये असे आहे. सन २०१४-१५ करिता मुंबई विभागातून प्रितम सुतार(रायगड), स्नेहल शिंदे (मुंबई) आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था हे मानकरी ठरले आहेत. तर २०१५-१६ साठी मुंबई विभागातून विनायक कोळी (ठाणे), प्रणिता गोंधळी (रायगड), पंचशील सेवा संघ (मुंबई उपनगर) यांना गौरविण्यात येणार आहे.राज्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा स्तरावर एक युवक, एक युवती तसेच नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतात. तर राज्यस्तर युवा पुरस्कारी क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवतीस तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतात. राज्य युवा पुरस्कार २०१४-१५ आणि २०१५-१६ करिता क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने क्रीडा विभागाच्या आठ विभागातून (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावती) प्रत्येकी आठ युवक, आठ युवती आणि आठ संस्थाची निवड केली आहे. राज्यातील युवांच्या समाज हिताचा कायार्ला प्रेरणा मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे २०१३ पासून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. (प्रतिनिधी)>२०१४-१५ चे राज्य युवा पुरस्कारार्थी नाशिक विभाग- विनीत मालपुरे (कळवण नाशिक), पूनम घुगे (नाशिक) वनवासी उत्कर्ष समिती (नंदूरबार), पुणे विभाग- प्रवीण निकम (पुणे), नेहा भाटे (पुणे) स्नेहालय संस्था (अमहदनगर). कोल्हापूर विभाग- लखन जाधव (कोल्हापूर), श्वेता परुळेकर (कोल्हापूर) नेहरू युवा मंडळ (पांगरी सातारा). औरंगाबाद विभाग- अझहर खान पठाण (औरंगाबाद), काजल भुसारे (औरंगाबाद) शाहू महाराज प्रतिष्ठान (बीड). लातूर विभाग- उमाकांत मिटकर (उस्मानाबाद), सुरेखा गिरी (लातूर), सोपानराव तादालपुरकर क्रीडा मंडळ (नांदेड). नागपूर विभाग- सारंग राघाट्टे (वर्धा), पल्लवी आमटे (चंद्रपूर) इको.प्रो.बहु.संस्था (चंद्रपूर). अमरावती विभाग- विशाल राखोडे (अमरावती), खुशबू चोपडे (अकोला), दीपस्तंभ संस्था (अमरावती).>२०१५-१६ चे राज्य युवा पुरस्कारार्थीं नाशिक विभाग- मनोहर जगताप (नाशिक), रुपाली माळी (धुळे), भरारी बहुउद्देशीय संस्था (जळगाव). पुणे विभाग- चिंतामणी पवार (सोलापूर), दीक्षा दिंडे (पुणे), अनाथ प्रेम संस्था (अमहदनगर). कोल्हापूर विभाग- अजित पोवार (कोल्हापूर), प्रियंका पाटील (कोल्हापूर), जनकल्याण संस्था (कोल्हापूर). औरंगाबाद विभाग- स्वप्निल चंदणे (औरंगाबाद), अश्विनी महिरे (औरंगाबाद), युवा प्रतिष्ठान (हिंगोली). लातूर विभाग- प्रवीण पाटील (लातूर), कृष्णाई उळेकर (उस्मानाबाद), पर्यावरण व वन्यजीव संरक्षण सेवाभावी संस्था (नांदेड). नागपूर विभाग- राजेश तलमले (भंडारा), अर्चना चुधरी (गडचिरोली), आरोग्य प्रबोधिनी (गडचिरोली). अमरावती विभाग- ऋषिकेश खिलारे (अमरावती), शारदा सोनकर (अकोला), स्वामी विवेकानंद बहु शैक्षणिक संस्था शिरपूर (मालेगाव वाशिम).