शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील व्यायामशाळा एफडीएच्या रडारवर, विनापरवाना औषधांचा सर्रास वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 08:58 IST

gyms : राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.  

मुंबई : राज्यासह मुंबईतील व्यायामशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.  व्यायामशाळेत प्रशिक्षकाचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधे घेऊन मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या असताना नुकतेच एफडीएने मीरारोड येथील विनापरवाना औषधांचा वापर करणाऱ्या व्यायामशाळेतून तब्बल ५ लाख ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. 

मुंबईतील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना १० नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, क्षेत्रीय औषध निरीक्षक  यांच्या  पथकाने कन्हैया कनोजिया यांच्या मालकीच्या मे. के-५ फिटनेस ॲण्ड वेलनेस स्टोर, शॉप नं. २, सरोगे एवेन्यू, बेवेर्ली पार्क, कनाकिया रोड, मीरा रोड (पु.), जि. ठाणे या दुकानात पंचासह तपास आणि चौकशीसाठी धाड टाकली. या जागेत व्यायामशाळेत  बॉडी बिल्डर्सद्वारे गैरवापर करीत असलेल्या मेफेनटरमीन इंजेक्शन, टेस्टोसटेरोण इंजेक्शन, ग्रोथ होर्मोन इंजेक्शन आणि विविध प्रकारच्या औषधांचा मोठ्या  प्रमाणावर साठा विनापरवाना विक्रीसाठी ठेवला होता. 

दुकानाचे मालक कन्हैया कनोजिया हे वेगवेगळ्या व्यायामशाळांमध्ये जाऊन लोकांना प्रशिक्षण देतात.  त्यांच्या दुकानात आढळून आलेला विविध उत्तेजनात्मक औषधांचा साठा हा स्वतःसाठी असल्याचे जबाबात सांगितले. मात्र, लाखोंचा साठा स्वतःच्या वापरासाठी बाळगणे चुकीचे असल्याचे दिसून येते.

सखोल चौकशी होणारकन्हैया कनोजिया यांनी ही औषधे कुठून प्राप्त केली, तसेच त्याची विक्री कोणास व कोणत्या व्यायामशाळांमध्ये करण्यात आली याबाबत अधिक सखोल चौकशी करण्यात येत असून सर्व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित आहे. 

बॉडीबिल्डर्स डॉक्टरांचा सल्ला न घेता उत्तेजनात्मक औषधांचा वापर करतात. या औषधांचा मुख्य उपयोग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांवर होतो. आजार नसताना हे औषधे घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.           - गौरीशंकर ब्याळे, सहआयुक्त

 

टॅग्स :FDAएफडीएMaharashtraमहाराष्ट्र