शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

राज्य सरकारचा अनोखा फंडा

By admin | Updated: May 7, 2015 02:59 IST

‘मराठी ज्ञानपीठ गौरव सोहळा’ या नावाने होणाऱ्या या सोहळ्यास गर्दी व्हावी म्हणून विनोद तावडे यांच्या मराठी भाषा विभागाने अनोखा फंडा शोधला आहे.

नारायण जाधव, ठाणेकुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेबु्रवारीपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना केंद्र सरकारने ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविल्यानंतर त्यांचा सत्कार गुरुवारी (७ मे) गेट वे आॅफ इंडिया येथे आयोजित केला आहे. ‘मराठी ज्ञानपीठ गौरव सोहळा’ या नावाने होणाऱ्या या सोहळ्यास गर्दी व्हावी म्हणून विनोद तावडे यांच्या मराठी भाषा विभागाने अनोखा फंडा शोधला आहे. एरव्ही शासकीय कार्यक्रम म्हटला की त्यात दर्दी लोक येत नाहीत. यामुळे दर्दी नाही किमान गर्दी तरी यावी म्हणून मराठी भाषा विभागाने तातडीने एका शासन निर्णयाद्वारे मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बजावले आहे. प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने मंत्रालयासह मुंबई कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे यासाठी आपापल्या विभागस्तरावर सूचना द्याव्यात, असे या आदेशात म्हटले आहे. या सोहळ्यात राज्यातील आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या ययातीकार वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विं.दा.करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांच्याह ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडिलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नंदेश उमप व मुग्धा वैशंपायन सहभागी होणार आहेत. मंत्री तावडे यांची संकल्पनासंध्याकाळी ७ ते ९ दरम्यान हा सोहळा रंगणार आहे. त्याची संकल्पना, संयोजन आणि निर्मिती सांस्कृतिक आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांची आहे. त्यामुळेच कदाचित त्यांनी गर्दी जमविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा सूर उमटू लागला आहे.दर्दी नाही किमान गर्दी तरी यावी म्हणून मराठी भाषा विभागाने तातडीने एका शासन निर्णयाद्वारे मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बजावले आहे.