शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कृषी सुधारणा विधेयके राज्य सरकार मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:23 IST

जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या.

अतुल कुलकर्णी - 

मुंबई : शेतकऱ्यांच्या देशभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे या कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करणारी तीन विधेयके राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती. ती विधेयके आता राज्य सरकार परत घेणार आहे. त्यामुळे राज्यात पूर्वीचीच कृषी धोरणे आणि कायदे लागू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून मागील अधिवेशनात शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) सुधारणा कायदा २०२१, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार सुधारणा कायदा २०२१ अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२१ महाराष्ट्र सरकारकडून विधिमंडळात मांडण्यात आले होते. जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या. विधिमंडळाकडे हे कायदेदेखील मागे घ्यावेत, अशी निवेदने मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली होती. राज्यभर यानिमित्ताने झालेल्या परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कायदेच रद्द करावेत, हा पर्याय समोर आला होता. अधिकच्या हरकती कायदे रद्द करण्याच्या बाजूनेच होत्या.राज्य सरकारने मांडलेल्या सुधारणा विधेयकात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले होते, फसवणूक झाल्यास शेतकऱ्याला दाद मागण्यासाठी व्यवस्था उभी करून देण्यात आली होती. 

हिवाळी अधिवेशनात विधेयके मागे घेऊ - थोरात कृषी कायदे सुधारणा मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लोकमतशी बोलताना म्हणाले, आता केंद्र सरकारने हे कायदे रद्द केल्यामुळे राज्य सरकारही आपली सुधारणा विधेयके येत्या अधिवेशनात मागे घेईल. आमचा हेतू शेतकऱ्यांना अधिक बळकट करणे हा होता. आम्ही सुचविलेल्या सुधारणा त्या दृष्टीने पथदर्शक होत्या, पण आता मूळ कायदाच राहिला नाही, तर सुधारणा विधेयकेही ठेवण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयके मागे घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरी