शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest : नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करायला राज्य सरकार समर्थ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 18:06 IST

Citizen amendment act : राज्यातल्या जनतेनं मनात कोणतेही गैरसमज ठेवू नयेत; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

नागपूर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. या कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. मात्र नागरिकांनी काळजी करू नये. त्यांच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. राज्यातल्या जनतेनं मनात कोणतेही गैरसमज ठेवू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. या कायद्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. त्यामुळे देशातच गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यासह देशभरात कित्येकजण रस्त्यावर उतरले आहेत. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये, असंआवाहन मी जनतेला करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कायदा लागू  झाल्यास आपल्याला देश सोडावा लागेल, अशी भीती काहींना वाटते. मात्र कोणीही चिंता करू नये. राज्य सरकार जनतेच्या हितांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यास समर्थ आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUddhav Thackerayउद्धव ठाकरे