शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यसरकारबरोबरच विधीमंडळानेही गदिमांचा यथोचित सन्मान करावा - हेमंत टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:01 IST

गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम घ्यावेच शिवाय विधानपरिषदेचे सदस्य म्हणून विधीमंडळानेही यथोचित सन्मान करावा अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात केली.

नागपूर : गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम घ्यावेच शिवाय विधानपरिषदेचे सदस्य म्हणून विधीमंडळानेही यथोचित सन्मान करावा अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात केली.गदिमानी लोकांच्या मनावर राज्य केले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गीत रचना चिरंतन स्वरुपाच्या आहेत. केवळ साहित्य क्षेत्रातच अग्रगण्य भूमिका नव्हे तर समाजजीवनातील सर्व घटकांमध्ये गदिमा हा सदैव जपण्याचा सांस्कृतिक संच होता असे उद्गार यावेळी आमदार हेमंत टकले यांनी काढले.विशेष म्हणजे सन १९६२ ते १९६८ या कालावधीत याच विधानपरिषदेचे गदिमा सदस्य होते. खऱ्या अर्थाने त्या कालावधीत परिषदेचा सुवर्णकाळ होता. त्याच कालावधीत प्रसिध्द संगीतकार वसंत देसाई हेसुध्दा परिषदेचे सदस्य होते. सध्या गदिमांचे जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होणार आहे. पुढे वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्राचे एक मान्यवर कवी ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात सर्व ठिकाणी कार्यक्रम जरुर घ्यावेत परंतु त्याचबरोबर आपल्या विधीमंडळाने गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी विनंती आमदार हेमंत टकले यांनी केली.आज योगायोगाने ही माहिती घेताना आपल्याला लायब्ररीमध्ये गदिमांचे हस्ताक्षर मिळाले आहे. त्यांनी स्वत:ची माहिती त्यात लिहिली आहे. त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यांनी आपले शिक्षण मॅट्रिक अनुत्तीर्ण असे लिहिले आहे असेही आमदार हेमंत टकले यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८