शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार मला करतेय ‘लक्ष्य’, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:21 IST

Rashmi Shukla : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस नियुक्त्या व बदल्यांसारखी संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

मुंबई : पोलीस नियुक्त्या व बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारासंबंधी अहवाल सादर केल्याने राज्य सरकार मला लक्ष्य करत आहे आणि बळीचा बकरा बनवत आहे, असे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंगसाठी परवानगी दिली. मात्र, आता ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सर्व दोष शुक्ला यांच्यावर टाकत आहेत, अशी माहिती रश्मी शुक्ला यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली. 

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण आणि पोलीस नियुक्त्या व बदल्यांसारखी संवेदनशील माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्ला यांच्याविरोधात काय पुरावे आहेत? त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग करून अहवाल सादर केल्याबद्दल सरकार त्यांच्यावर रागावले आहे. शुक्ला केवळ त्यांचे कर्तव्य बजावत होत्या.

राज्य सरकारला कोणती गोष्ट खटकत आहे, हे सर्वांना माहीत आहे. विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीच्या हातात ही कागदपत्रे पडली आणि त्यांनी ती प्रसारमाध्यमांसमोर आणली, असेही जेठमलानी यांनी म्हटले.  न्यायालयाने या याचिकेवर पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी ठेवली. तोपर्यंत शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई करणार नसल्याचे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयाला दिले.

‘आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या’फोन टॅप करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी कुंटे यांच्याकडे ते अधिकार होते. आता कुंटे यामधून हात झटकत आहेत आणि सर्व दोष शुक्ला यांना देत आहेत. त्यांनी या कामासाठी दोनदा परवानगी दिली. मग ही परवानगी त्यांनी सारासार विचार न करता दिली का? शुक्ला ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्यास तयार आहेत. कुंटे ही टेस्ट करायला तयार आहेत का? असा सवाल जेठमलानी यांनी केला.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाCourtन्यायालय