शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणात वाटेकरी मान्य नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:00 IST

​​​​​​​भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले.

मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे, याबाबत दुमत नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल, तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. मराठा समाजाला आरक्षण देताना, आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी कलम टाकले. ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, या आरक्षणात कुणालाही वाटेकरी केले जाणार नाही, हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.जोपर्यंत ओबीसी समाजात ३४६ घटक आहेत, जोपर्यंत या घटकांचा विकास होत नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. आगामी काळात या सर्व घटकांचे मेळावे घेतले जातील. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असे ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचे योगदान मोठे आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटले जायचे, असेदेखील फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण