शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सारथी संस्थेबद्दल ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मराठा समाजाच्या प्रयत्नांना मोठं यश

By कुणाल गवाणकर | Updated: October 16, 2020 12:11 IST

Marathi Community sarathi: मराठा समाजानं वर्षभर केली होती आंदोलनं; अखेर प्रयत्नांना यश

मुंबई: मराठा समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं 'सारथी'ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं मराठा समाजानं स्वागत केलं आहे. मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख

'सारथी' संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. 'सारथी'ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर सरकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण आल्यानं मर्यादा आल्या होत्या. निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यासह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्या होत्या, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी केला होता.मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला

सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी वर्षभर आंदोलनं झाली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता 'सारथी'ला स्वायता बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, सारथी बंद होणार नाही असे सांगताना आठ कोटींचा निधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. सारथी संस्थेला १ हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून ही संस्था विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन अधिक चर्चेत आली. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. आपण ओबीसी असल्यानं मला टार्गेट करण्यात येत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा