मुंबई - राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनलाभ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. 2017 मधील थकित महागाई भत्त्यासह हे वेतन देण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले,"राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्धारित तारखेपासूनच (1 जानेवारी 2016) सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. यासाठी सरकारने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पण सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या आहेत. त्या त्रुटींसंदर्भात सुनावणी घेण्याचे काम या समितीला करावी लागले. हे काम आंतिम टप्प्यात असून, लवकरच अहवाल सादर करू असे समितीने सांगितले आहे. त्यानंतर निर्धारित वेळेपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."
राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 10:41 IST