शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचा पुढाकार, मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:09 IST

सहजपणे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नाने जगभरात गंभीर रूप धारण केले आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

मुंबई - सहजपणे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नाने जगभरात गंभीर रूप धारण केले आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांच्या वापरावर बंदी घाणल्याचा निर्ण राज्य सरकारने आज घेतल आहे. मंत्रालयात झालेल्या पर्यावरण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. प्लॅस्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी दुधाच्या, तेलाच्या आणि औषधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांसाठी लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या तयार करण्यासाठी निधी देणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तरतूद असणार आहे. त्याअंतर्गत 3 ते 6 महिन्यांची शिक्षा आणि दुकानाचा परवाना रद्द करण्याचा  प्रस्तावही राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.  बंदीनंतर दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे.  संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. आजच्या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार